Home राष्ट्रीय गरज पडल्यास दहशतवादाविरोधात पुन्हा सीमेपार जाऊ! – राजनाथ सिंह

गरज पडल्यास दहशतवादाविरोधात पुन्हा सीमेपार जाऊ! – राजनाथ सिंह

0

‘सीमेच्या पलीकडून वारंवार होणारे हल्ले हिंदुस्थान आता मुळीच सहन करणार नाही’ असा इशारा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे. “आमच्या देशाच्या सुरक्षेला जर सुरुंग लावण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, तर सीमापार करून दहशतवाद कामयचा संपवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू” असे राजनाथ सिंह बालकोट हल्ल्याच्या वर्षपूर्ती बद्दल बोलत होते.

मागच्या वर्षी २६ फेब्रुवारीला पुलवामा येथील ४० CRPF जवान शहीद झाले होते. त्याचा बदला म्हणून घेण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आज वर्षपूर्ती झाली.

“मी मा. नरेंद्र मोदींचे आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळेच दहशतवादाला सामोरे जाण्याचा भारताचा मार्ग बदलला आहे आणि वेळ पडल्यास सीमा पार करत आम्ही दहशतवाद रोखण्यासाठी आम्ही जरादेखील कचरणार नाही” असे राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे.

वाचा राजनाथ सिंह यांचे ट्विट