Home राष्ट्रीय हंदवाडा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचा बदला घेणार, पाकिस्तान विरुद्ध लवकरच मोठी मोहीम:...

हंदवाडा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांचा बदला घेणार, पाकिस्तान विरुद्ध लवकरच मोठी मोहीम: लष्करप्रमुख

0

“हंदवाडामध्ये दहशतवाद्यांपासून नागरिकांना वाचवत असताना आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या पाचही सुरक्षा कर्मचाऱ्यांचा भारताला सार्थ अभिमान आहे”, असं लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटलं आहे. “शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या प्रत्येक विकृतीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल”, असंही लष्करप्रमुखांनी सांगितलं आहे.

“पाकिस्तानकडे दूरदृष्टीचा अभाव असून दहशतवादी भारतात पाठवण्याचा त्यांचा अजेंडा कायम आहे. पाकिस्तान जो पर्यंत दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद करत नाही, तो पर्यंत आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देतचं राहणार”, असं नरवणे यांनी सांगितलं.

“घुसखोरीच्या घटनांवरुन पाकिस्तानला कोरोना विरोधात लढा देण्यात कुठलाही रस नसल्याचं दिसतं”, असं नरवणे म्हणाले.

हंदवाडा एन्काऊंटरमध्ये कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासह मेजर अनुज सूद, नायक राजेश कुमार, लान्स नायक दिनेश सिंह आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलातील सब इन्सपेक्टर सागीर पठान शहीद झाले.

दरम्यान, 21 राष्ट्रीय रायफल्स युनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा हे या चार जणांसह दहशतवादी लपलेल्या घरामध्ये घुसले होते.