Home राष्ट्रीय वडिलांचा कन्या दानास नकार, तुम्हाला अभिमान वाटेल, काय आहे कारण ?

वडिलांचा कन्या दानास नकार, तुम्हाला अभिमान वाटेल, काय आहे कारण ?

0

प्राईम नेटवर्क : मंडळी सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात वेगवेगळे विषय चर्चेत असतात, त्यापैकीचं एक म्हणजे विवाहसोहळा. मध्यंतरी बी टॉउन मध्ये साथ आल्या सारखी एका पाठोपाठ एक विवाह होत होते. दिपवीर, प्रियंका, ईशा अंबानी हे बहुचर्चित विवाह सोहळे मीडियामध्ये बरेच दिवस रवंथ केले जात होते. अशीच सध्या सोशल मीडियावर एक बंगाली लग्नसोहळा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.मुलीच्या वडिलांनी कन्यादान करण्यास नकार दिल्यामुळे हा विवाह सोहळा सध्या चर्चेत आहे.

एखाद्या मुलीचं लग्न हे तिच्या बापासाठी खूप खास असतं. बाप कितीही गरीब असो पण आपल्या मुलीच्या लग्नात तो काही कमी पडू देत नाही. विवाहसंस्कारात कन्यादान हे खूप श्रेष्ठदान मानलं गेलंय. पण, कोलकत्ता मधील एका नववधूच्या पित्याने अभिमानास्पद निर्णय घेतला आहे. “मुलगी म्हणजे संपत्ती नाही जी मी दान करेन” असे म्हणत मुलीच्या वडिलांनी कन्यादान करण्यास नकार दिला आहे. आहे कि नाही कौतुकास्पद गोष्ट?
अस्मिता घोष या महिलेने ट्विटर वर या लग्नातील फोटो पोस्ट केले आहे तसेच लग्नातील घडलेल्या घटना सांगितल्या आहेत. हि पोस्ट वाचून प्रत्येक नेटिझन्सच्या मनात “मेरा देश बदल रहा है।” येत असेल हे नक्की.

फक्त एवढंच नाही बरं का मंडळी ! तर विवाहाच्या विधीसाठी महिला पुजाऱ्यांना बोलवण्यात आले होते. याशिवाय लग्नसमारंभात नवरीमुलीचा परिचय करून देताना प्रथम आईचे अन् मग वडिलांचे नाव घेण्यात आले. मुलीच्या वडिलांनी घेतलेल्या या धाडशी निर्णयाचे सोशल मीडियावर तोंडभरून कौतुक केले जात आहे.
तुमचं याबद्दल काय मत आहे ?