Home राष्ट्रीय “दहशत विरोधी कारवाई आणखी वेगवान करणार”-नरेंद्र मोदी.

“दहशत विरोधी कारवाई आणखी वेगवान करणार”-नरेंद्र मोदी.

0

प्राईम नेटवर्क :जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या पाशवी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 40 हून अधिक जवान हुतात्मा झाले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा निषेध केला. या हल्याच्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा मिळणारच असेही मोदींनी सांगितले. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान बोलत होते.

पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, ”दहशत विरोधी कारवाई आणखी वेगवान करणार असून दहशतवादी संघटना आणि त्यांना पोसणाऱ्यांना या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल. शेजारील देशांचे कुटील मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही. असल्या भ्याड हल्ल्यांना भारत चोख प्रत्युत्तर देईल”.

”जागतिक स्तरावर एकट्या पडलेल्या शेजारील देशाला वाटत असेल की, अशा प्रकारच्या षड़यंत्रांमुळे भारतात अस्थिरता निर्माण होईल, तर तसे कदापि शक्य होणार नाही. 130 कोटी देशवासीय अशा प्रकारच्या कटकारस्थानांविरोधात आणि भ्याड हल्ल्यांविरोधात सडेतोड प्रत्युत्तर देतील.”असेही मोदींनी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान,आपला देश एकजूट आहे,फक्त राजकारण करू नका, असं आवाहनही यावेळेस पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केले आहे.

या हल्याचा जगभरातून निषेध होत आहे. त्यामुळे जगातील सर्व मानवतावादी शक्तिंनी एक होऊन या आतंकवादाशी दोन हात केले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील. या हल्यात हुतात्मा झालेला प्रत्येक जवानाच्या आत्म्याला नमन करुन मोदींनी हुतात्म्यांची आहुती वाया जाणार नाही असे सांगितले.

या परिस्थितीला प्रत्युतर देण्यासाठी समृद्धीच्या आणि विकासाच्या रत्स्याला आम्ही आणखी मजबूत करु असे मोदींनी यावेळी बोलताना नमुद केले. जवानांच्या कुटुंबीयांसहीत माझ्या संवेदना कायम आहेत, अशा भावना यावेळी मोदींनी व्यक्त केल्या.