प्राईम नेटवर्क : भारतात दहशत माजवणे आणि प्रगतीत आडकाठी आणणे हे दहशतवाद्याचं लक्ष असून भारताला अस्थिर कऱण्यासाठी शत्रू देश प्रयत्न करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. भाजपाने ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रमाची सुरुवात केली असून यानिमित्त कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधताना त्यांनी सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणाव स्थितीवर भाष्य केलं. इतकेच नाही तर, शत्रूचा भारताला अस्थिर करण्याचा कट मुळीच यशस्वी होऊ देणार नाही असंही ते म्हणाले.
‘देशाच्या सुरक्षेसाठी संकल्प केलेला आपला जवान सीमेवर लढत आहे. आपण सगळे पराक्रमी योद्धे असलेल्या पराक्रमी भारताचे नागरिक आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना देशाच्या समृद्धीसाठी दिवस-रात्र एक करावा लागेल. आमचा सैन्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे असं काहीही होऊ नये, ज्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
भारत एकीने जगणार,वाढणार,लढणार आणि जिंकणार पण. सध्या देशाची भावना वेगळ्या स्तरावर आहे,तसेच तणावग्रस्त परिस्थितिही निर्माण झाली आहे. देशाचा वीर जवान सीमेवर आणि सीमेपारही आपल धैर्य दाखवत आहे. संपूर्ण देश एक आहे आणि आपल्या जवानांच्या पाठीशी उभा आहे. संपूर्ण जग आपली इच्छाशक्ती पाहत आहे’, असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.
भारतातील तरुण उत्साहित आहे असं सांगताना प्रत्येकाने आपापल्या परिनं देशासाठी योगदान द्यावं असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. कोणताही विद्यार्थी कितीही हुशार असला तरी परिक्षेच्या शेवटी चांगलं यश मिळण्यासाठी त्याला संपूर्ण ताकद लावावी लागतेच असं ते म्हणाले. आता प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य आहे असं वाटत आहे. भारतीयांची एकता हेच आपल बळ आहे असंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.