Home राजकीय भाजप नेते विनय कटियार यांना जीवे मारण्याची धमकी….

भाजप नेते विनय कटियार यांना जीवे मारण्याची धमकी….

0

काल 12 डिसेंबर रोजी विनय कटियार यांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे की, त्यांना एका अज्ञात व्यक्तीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. कटियार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना त्यांच्या खाजगी क्रमांकावर कॉल आला होता.

मीडिया रिपोर्ट नुसार विनय कटियार आपल्या फ्लॅटवर असताना बुधवारी रात्री त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. कटियार फोनवर बोलत आहेत याची खात्री पटताच कॉल करणार्याने कटियार यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली व म्हणाला “कधीपर्यंत स्वतःला वाचवशील, तुझ्याकडे थोडेच दिवस उरले आहेत आम्ही तुला मारून टाकू” पोलिसांनी कटियार यांची तक्रार नोंदवली असून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न चालू आहे.