Home राजकीय झारखंडमध्ये भाजपला मोठा धक्का : काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल !

झारखंडमध्ये भाजपला मोठा धक्का : काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल !

0

महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकी नंतर भाजपच्या वाट्याला क्षणिक आनंद आला होता. मात्र युती तुटल्यानंतर भाजपच्या आशा पुन्हा मावळल्या आणि शेवटी बहुमत असूनही विरोधी पक्ष म्हणून कारभार पहावा लागला तर महाविकास आघाडीने सत्ता मिळवली. आता झाडखंडमध्ये देखील भाजपचा टिकाव लागेल असं दिसत नाही. कारण झारखंड विधानसभा निवडणूक निकालाचा कल लक्षात घेता काँग्रेस व मित्रपक्ष बहुमताकडे वाटचाल करत आहेत.

८१ विधानसभेच्या जागा असलेल्या झारखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी ४१ जागांची गरज आहे. काँग्रेस व मित्रपक्ष बहुमताकडे जोरदार वाटचाल करत असून भाजप बद्दल राजकीय वर्तुळात चर्चा पेटली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्रात बिजेपीला बहुमत मिळूनही शिवसेना सत्तेवर आहे त्यामुळे आता झारखंड मध्ये काय होईल हेही वेळच सांगेल.