Home राजकीय भाजपचे ‘हे’ खासदार म्हणाले ‘संस्कृत बोला मधुमेह अन कोलेस्ट्रॉल टाळा’

भाजपचे ‘हे’ खासदार म्हणाले ‘संस्कृत बोला मधुमेह अन कोलेस्ट्रॉल टाळा’

0

संस्कृत विश्वविद्यालय विधेयकाच्या चर्चे दरम्यान बोलत असताना भाजप खासदार गणेश सिंह यांनी गुरुवारी एक अजबच दावा केला आहे. गणेश सिंह म्हणतात “संस्कृत भाषा बोलल्याने शरीरातील मज्जासंस्था मजबूत होतात आणि मधुमेह व कोलेस्ट्रॉल सारखे आजार होत नाहीत असा शोध अमेरिकेच्या एका संस्थेने लावला आहे”

त्याचबरोबर गणेश सिंह असेही म्हणाले की, “नासाने केलेल्या एका संशोधनात अस निष्पन्न झाले आहे की ‘जर संगणकाच्या प्रोग्राम मध्ये संस्कृत भाषा वापरली तर संगणक सुलभ होईल” मीडिया रिपोर्ट नुसार या पूर्वी देखील भाजप नेत्यांनी अशी अनेक वक्तव्य केली आहेत. लोकसभेने गुरुवारी विश्वविद्यालय विधेयक 2019 दरम्यान देशातील 3 मानद संस्कृत विद्यापीठांना ‘केंद्रीय विद्यापीठाचा’ दर्जा दिला आहे.