Home राजकीय रामलीला मैदानावर आज ‘भारत बचाव रॅली’ : मोदी सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक

रामलीला मैदानावर आज ‘भारत बचाव रॅली’ : मोदी सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक

0

नागरिकत्व सुधारणा विधेयक, आर्थिक मंदी, महिलांवरील अत्याच्या आशा अनेक मुद्यांवरून काँग्रेसने मोदी सरकार विरोधात आक्रमक पाऊल उचललं आहे. मीडिया रिपोर्ट नुसार दिल्लीतील रामलीला मैदानावर मोदी सरकार विरोधात आज भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

या रॅलीत सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासह कॉग्रेसचे अनेक दिग्गज उपस्तीत राहणार आहेत. रामलीला मैदानावर चौबाजुनी कार्यकर्त्यांनी पोस्टर्स लावले असून कार्यकर्त्यांमध्ये रॅलीसाठी मोठा उत्साह दिसत आहे. या रॅलीला देशातील जवळपास सर्वच राज्यातून हजारो कार्यकर्ते येणार असून रॅली भव्य असणार असे चिन्ह आहेत.