
कालच झालेल्या पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा पेटली आहे की, ‘मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या नीलामीमध्ये मोदींच ५०० रुपयांचं उपरणं (गळ्यातला रुमाल) ११ कोटी रूपंयांमध्ये निलाम झाला आहे, ज्याची रक्कम त्यांनी ‘राहत कोशला’ दान केली आहे.’ आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की हे खरं आहे का? कारण बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावर फोटो सहित माहिती पोस्ट करून ही गोष्ट खरी असल्याचा दावा केला आहे.

हे खरं आहे की दिल्लीच्या ‘राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय’ येथे मागील एक वर्षापासून मोदींच्या २७७२ वस्तू नीलामीसाठी ठेवण्यात येतात, ज्या pmmementos.gov.in या संकेतस्थवरूनही नीलाम केल्या जातात; ज्यात त्यांची शाल, फेटा, जॅकेट, वाद्य इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. मात्र अद्याप त्यांच्या या ११ करोड रुपयांच्या उपरण्याची खात्रीशीर सत्य माहिती मिळालेली नाही.