Home राजकीय राहुल गांधींना ‘लायर ऑफ दि इयर’ हा पुरस्कार द्यायला हवा : प्रकाश...

राहुल गांधींना ‘लायर ऑफ दि इयर’ हा पुरस्कार द्यायला हवा : प्रकाश जावडेकर

0

“राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा आणि आताही कधी कुठे काहीही बोलतात. एवढंच नाही तर ते खोटारडे देखील आहेत.” अशी टीका भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली आहे. सोबतच जावडेकर म्हणाले, “राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे अगोदर गांधी कुटुंब वैतागलं होतं आता काँग्रेस पक्ष आणि जनतासुद्धा वैतागली आहे.” अशी जावडेकरांनी राहुल गांधींवर तोफ डागली.

मीडिया रिपोर्ट नुसार राहुल गांधी एका सभेदरम्यान म्हणाले होते की ‘NPR हा गरिबांवर विनाकारण लादण्यात आलेला एक टॅक्स आहे.’ राहुल गांधींना प्रतिउत्तर देत जावडेकर म्हणाले “NPR हा टॅक्स आहे? NPR ही एक लोकसंख्या नोंदणी आहे. ज्यात देशाच्या नागरिकांची माहिती नोंदवलेली असते. यात टॅक्स चा संबंध कुठे आला. उलट टॅक्स ही काँग्रेसने भारतात रुजवलेली संस्कृती आहे. जयंती टॅक्स, कोळसा टॅक्स, 2 जी टॅक्स, जिजाजी टॅक्स” असं म्हणत जावडेकरांनी काँग्रेसच्या सर्व घोटाळ्यांचा उल्लेख केला.