Home राजकीय शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष – नारायण राणे.

शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष – नारायण राणे.

0

प्राईम नेटवर्क : काल झालेल्या भाजप-शिवसेना युती नंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. “गेल्या 4 वर्षात भ्रष्टाचार कुठे कमी झाला? मुंबई महापालिकेमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होतो. तो लपवण्यासाठी ही युती झाली. या काळात काय विकास केला हे सरकारने सांगावे. माझा आघात शिवसेनेवर असेल मात्र, भाजपवर नसेल. मी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला नाही.”

शिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष असून त्यांच्या नेत्यांनी युती करून स्वत:चीच फजिती करून घेतली आहे.जनतेसाठी नाही तर मातोश्रीच्या फायद्यासाठी युती झाल्याची टीका महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी केली. ही मंडळी टक्केवारीवर जगणारी आहेत. कित्येक प्रकल्प मातोश्रीच्या भागीदारीवर सुरु आहेत असे आरोपही राणेंनी केले.

पुढे ते असेही म्हणाले कि, “मी स्वबळावर लढणार नाहीतर काय करणार. माझ्या पक्षाचा जन्म भाजपच्या सांगण्यावरूनच झालेला आहे. भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेलो. मात्र, राजीनामा का द्यावा, मी भाजपचा सदस्य नाही. त्यांनी घेतले त्याला मी काय करू. खासदारपदी ठेवावे की न ठेवावे त्यांनी ठरवावे. दोन पक्षांचे जाहीरनामे मी कसे बनवणार. माझ्या पक्षाचा जाहीरनामा मीच काढणार.”

नितेश राणे काँग्रेसचे आमदार आहेत. ते स्वाभिमान पक्षात सहभागी होतील का, तर राणे यांनी हो असे उत्तर दिले. माझा पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार आहे. मग तो मराठवाडा असो की विदर्भ. लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेत मी लढणार की नाही ते ठरवणार आहे.पाठिंबा दिला म्हणजे महाआघाडीत जाणे होत नाही. तटकरेंना पाठिंबा दिला तेव्हा मी राष्ट्रवादीत गेलो असे झाले नव्हते, असेही राणे म्हणाले.शिवसेना फक्त 10च जागा जिंकेल असं भाकितही करायला ते विसरले नाहीत.