Home राजकीय सोनिया गांधी, मनमोहन सिंग गेले पी. चिदंबरम यांच्या भेटीला

सोनिया गांधी, मनमोहन सिंग गेले पी. चिदंबरम यांच्या भेटीला

0

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी गेल्या ५ सप्टेंबरपासून तिहार तुरुंगात अटकेत आहेत. मीडिया न्यूज नुसार तिहार तुरुंगात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी पोहचल्या आहेत. निवडणुकीच्या वातवरणात त्यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण देत आहे. पी. चिदंबरम यांचे पुत्र खासदार कार्ती चिदंबरम देखील त्यांच्यासोबत आहेत.

मनमोहन सिंग व सोनिया गांधी हे दोघे आज त्यांची भेट घेऊन काय चर्चा करणार आहेत याचा अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र काँग्रेस पक्ष चिदंबरम यांच्या सोबत आहे, असा संदेश या भेटीतून देण्याचा हेतू सोनियांचा आहे अशी माहिती मिळत आहे.

मागील काही दिवसांत पराभव, राजीनामा व चिदंबरम यांच्यासारख्या नेत्यांच्या अटकेनंतर काँग्रेस कोलमडले आहे. मात्र, सोनियांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून त्या हे सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. पक्ष पुन्हा लढण्याच्या स्थितीत यावा हाच यामागचा मुख्य हेतू. त्या घेत असलेल्या चिदंबरम यांची भेट हा याचाच भाग असल्याची मीडिया न्यूज आहे.