Home राजकीय विरोधकांकडून देशात भूकंप येईल,असे सांगण्यात आले होते. अद्यापही भूकंप आलेला नाही- पंतप्रधान

विरोधकांकडून देशात भूकंप येईल,असे सांगण्यात आले होते. अद्यापही भूकंप आलेला नाही- पंतप्रधान

0
New Delhi: Prime Minister Narendra Modi

प्राईम नेटवर्क: तीन दशकानंतर पूर्ण बहुमताचे भाजप सरकार 2014 मध्ये सत्तेवर आले. आमच्या कार्यकाळात सर्वांत जास्त महिलांची संख्या असलेली संसद राहिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेत सांगितले. तसेच यापूर्वी विरोधकांकडून देशात भूकंप येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अद्याप भूकंप आलेला नाही,असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी लोकसभेत बोलताना म्हणाले कि,”परराष्ट्र आणि संरक्षण या महत्वाच्या खात्यातही महिला मंत्री विराजमान आहेत. इतकच काय तर लोकसभा अध्यक्षही महिलाच आहेत. सभागृहातील सर्व सदस्यांचा गौरवपूर्ण सहभाग आहे. जागतिक पातळीवर भारताची प्रगती होत आहे. भारत जगात आता सहाव्या क्रमांकावर आहे. जगातील प्रतिष्ठित संस्था कोणत्याही अडचणीविना आपली इच्छा व्यक्त करत आहे. भारत अत्याधुनिक,आर्थिक क्षेत्रात प्रगती करत आहे. जास्तीत जास्त क्षेपणास्त्र निर्मितीत भारत आघाडीवर आहे. जगातील कोणत्याही देशात बहुमताचे सरकार असलेला पंतप्रधान जातो तेव्हा काय प्रतिष्ठा मिळते याचा अनुभव मी घेतलाय. ह्या अनुभवाचे श्रेय मी माझ्या जनतेला देतो, कारण ३० दशकानंतर सरकार बदलवण्याचा निर्णय फक्त त्यांचा होता.”

“219 विधेयक मांडण्यात आले यातील अनेक विधेयक मंजूर करण्यात आले. बेहिशेबी मालमत्ता,आर्थिक गैरव्यवहार यांसारख्या विषयांवर कायदेशीर कारवाईसाठी कायद्याची निर्मिती या सभागृहाने केली. याच सभागृहाने जीएसटीसाठी रात्री 12 वाजता संसदेत सुरवात केली. आधारची अंमलबजावणी आमच्या सरकारने केली.तसेच देशातील 1400 पेक्षा अधिक कायदे आमच्या सरकारने रद्द केले. खासदारांवर विविध मुद्यांवर टीका केली जात होती. यापूर्वी विरोधकांकडून देशात भूकंप येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. अद्याप भूकंप आलेला नाही अन येणारही नाही कारण हे लोकतंत्र आहे.”