Home राजकीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडी तोडा अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला तुकड्या तुकड्याने संपवतील...

उद्धव ठाकरे महाविकास आघाडी तोडा अन्यथा काँग्रेस राष्ट्रवादी तुम्हाला तुकड्या तुकड्याने संपवतील : सुब्रह्मण्यम स्वामी

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी तोडावी आणि राज्य सरकार बरखास्त करावे. नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादी मिळून उद्धव ठाकरेंना चिरडून टाकतील असा इशारा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दिला आहे.

स्वामी यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार हे कोरोना विषाणू वर मात करण्यासाठी असमर्थ आहे आणि यावर आता राष्ट्रपती राजवट हाच एक उपाय आहे.उद्धव यांनी आत्ताच महाविकासआघाडी तोडावी. कलम ३५६ नुसार यावर राष्ट्रपती निर्णय घेऊ शकतात असेही त्यांनी सुचविले आहे. महाराष्ट्रातील सध्याची स्थिती पाहता तिथे राष्ट्रपती शासन लावणे हाच एक मार्ग असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे अधिकारी अदमा डायंगे यांच्या एका वक्तव्यवर सुद्धा तीव्र नाराजी आणि आक्षेप दर्शविला आहे. मुस्लिम नागरिकांच्या संदर्भात अदमा डायंगे यांनी केलेल्या वक्तव्याचा ट्विटर द्वारे समाचार घेताना स्वामी म्हणाले, ” संयुक्त राष्ट्र संघाचे अधिकारी अदमा डायंगे यांनी न्यूयॉर्कमध्ये माझ्याविषयी एका प्रसिद्धी पत्रात चुकीची आणि मानहानी करणारी माहिती प्रकशित केली आहे. भारतात संविधानानुसार मुस्लिम नागरिक हिंदूंच्या बरोबरीचे नाहीत असे मी एका पाकिस्तानी दूरचित्र वाहिनीला म्हटले असे यात सांगण्यात आले आहे.