उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ” यापुढे जर कुठल्याही राज्याला उत्तर प्रदेश मधील कामगार लागल्यास आमची परवानगी घ्यावी लागेल” असे म्हटले होते. योगीजींच्या या भूमिकेने मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले आहेत त्यांनी सोशल मीडिया वर पोस्ट करत योगीजींवर आक्रमन केले आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे की जर युपी मधून कुठलेही लोक महाराष्ट्रात येणार असतील तर त्यांना पोलीस परवानगी शिवाय तसेच शासनाच्या परवानगी शिवाय प्रवेश करू देणार नाही, तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाला सुद्धा या बाबत आवाहन केले आहे.
लॉकडाऊन मुळे धोक्यात आलेला रोजगार पाहून परप्रांतीय मजुरांचे लोंढेच्या लोंढे गावाकडे परत निघाले आहेत, यावर योगीजींनी टीका करत म्हटले होते की उद्योगधंदे ज्या कामगारांच्या भरवशावर चालतात त्यांना महाराष्ट्र सरकारने वाऱ्यावर सोडले आहे.
काहींच्या मते योगी आदित्यनाथ हे त्यांनी रद्द केलेल्या मजूर कायद्यांवरचे लक्ष हटवण्यासाठी हा हुल्लडपणा करत आहेत. मागच्या काही दिवसात योगी सरकारने मजूर हिताचे अनेक कायदे रद्द केले असून त्यामुळे मजुरांचे पिळवणूक होण्याची शक्यता वाढल्यामुळे सरकारविरोधी भावना निर्माण न होवो म्हणून मजुरांच्या हिताचे पोकळ भाष्य करत असल्याचे काही नेत्यांचे म्हणने आहे.