Home राजकीय उर्मिला मातोंडकर यांनी का दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा ?

उर्मिला मातोंडकर यांनी का दिला काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा ?

0

काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सदस्य बनलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून नुकताच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात किंमत उरली नसल्याने त्यांनी राजीनामा दिला असावा अशी चर्चा राजकीय नेत्यांमध्ये सुरू आहे.

उर्मिला यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या काळात पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांना सहकार्य दाखवले नाही. उत्तर मुंबई मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणुक लढवली होती परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार पक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. याबद्दल तक्रार करण्यासाठी उर्मिला यांनी पक्षाचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांना पत्र लिहिले आणि सहकार्य न केल्याबद्दल त्या नेत्यांवर कारवाई करावी असे सुचवले. परंतु या गोष्टीची दखल घेतली गेली नाही व पत्रातील माहिती मीडियाला पुरवण्यात आली असा आरोप त्यांनी केला. तीन दिवसांपूर्वी आपण राजीनामा देत असल्याचे पत्र त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते.