Home आध्यात्मिक भगवान राम यांना एक बहीण सुद्धा होती, परंतु रामायणात का राहिली अज्ञात...

भगवान राम यांना एक बहीण सुद्धा होती, परंतु रामायणात का राहिली अज्ञात ? काय आहे तिची कहाणी

0
lord-ram-sister-shanta

रामायणातील सर्व पात्रां बद्दल जवळ जवळ सर्वांनाच ठाऊक आहे. प्रत्येकाला माहित आहे की प्रभू श्री राम यांना तीन भाऊ होते, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, परंतु प्रभू श्री राम यांना शांता नावाची एक बहीण सुद्धा होती हे कदाचित फार कमी जणांना माहित असेल. रामायणात शांताचा फार कमी उल्लेख आहे. शांता या चार भावांची सर्वात मोठी बहीण होती.

शांता कोण होती?
रामायणात ही शांताचा उल्लेख आहे. ती राजा दशरथ आणि कौशल्याची कन्या होती, शांता हिला वर्षिणी आणि तिचा पती रोमपाद यांनी दत्तक घेतले होते.

शांता आणि ऋषि श्रृंग यांचे वंशज हे सद्या सेंगर राजपूत आहेत, ज्यांना एकमात्र ऋषि वंशी राजपूत म्हटलं जातं.

रामाची मोठी बहीण शांताची कहाणी
शांता ही महाराजा दशरथ आणि कौशल्याची कन्या होती, त्यांना अंग देशाचा राजा रोमपाद आणि कौशल्याची मोठी बहीण वर्षिणी यांनी दत्तक घेतले होते. वर्षिणी हिला मूल नव्हते. एकदा वर्षिणी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पती समवेत अयोध्येत आली.वर्षिणीने शांता हिला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. वर्षिणी ची ही इच्छा ऐकून राजा दशरथाने आपली मुलगी शांता वर्षिणीला दत्तक देण्याचे वचन दिले आणि अशा प्रकारे शांता अंग देशाची राजकन्या बनली.

भावांच्या जन्मासाठी मदत
शांताच्या जन्मा नंतर राजा दशरथाला मूल होत नव्हते त्याला असा मुलगा हवा होता जो त्याच्या राज घराण्याचा वारसा चालवेल. राजा दशरथाने ऋषी श्रृंग यांना पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी बोलावलं, आणि यांनतर राम, भरत आणि जुळे लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला.

शांताच्या लग्नाचे कारण

शांताला वेद, कला व हस्तकलेचे अनन्य ज्ञान होते, ती खूप सुंदर होती. एक दिवस राजा रोमपाद शांताशी बोलण्यात व्यस्त होता, जेव्हा एका याचकाने शेतीसाठी पावसाळ्यात राजाकडे मदत मागितली. राजा रोमपाद याने याचकाच्या आग्रहाकडे लक्ष दिले नाही. राजाने लक्ष न दिल्या मुळे संतप्त होऊन तो याचक तेथून निघून गेला. हा याचक इंद्राचा फार मोठा भक्त होता, आपल्या भक्ताच्या या अपमानामुळे इंद्र देव संतप्त झाले. त्यामुळे त्यावर्षी अंग देशात पावसाळ्यात फारच कमी पाऊस झाला. दुष्काळामुळे सर्वत्र आक्रोश पसरला.

या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी रोमपद ऋषि शृंग यांच्याकडे गेले. राजा रोमपद यांनी ऋषि शृंग यांना यज्ञ करण्याची विनंती केली. ऋषि शृंग यांच्या नेतृत्वात यज्ञ केला गेला, ज्या नंतर अंग देशात पाऊस पडला. या नंतर प्रसन्न होऊन राजा रोमपद यांनी आपली मुलगी शांता हिचा विवाह ऋषि शृंग यांच्याशी लावून दिला.