जगातील सर्वात यशस्वी गोलंदाज आणि यॉर्करचा किंग म्हणून ओळख असलेल्या ‘जसप्रीत बुमराहची’ दहशत सर्वचं खेळाडूंमध्ये आहे. आजही जसप्रीत बुमराहच्या यॉर्करचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना अजिबात जमले नाही आहे. अशाच एका महान फलंदाजाने बुमराहबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऐरोन फिंचने (Aaron Finch) जसप्रीत बुमराहची मला भीती वाटायची असे नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले.
ऐरोन फिंचने २०१८ साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला असताना त्याला भयानक वाईट स्वप्न पडायची असे सांगितले. ही स्वप्ने होती भारताचे जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांची. स्वप्नातसुद्धा भुवनेश्वर आणि बुमराह मस्तीसाठी त्याची विकेट घेताना फिंचला दिसायचे.ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील अमेझॉन व्हिडीओज वर प्रसिद्ध झालेल्या ‘द टेस्ट’ या माहितीपटात फिंचने, भुवनेश्वर मला बाद करत असल्यामुळे मला अक्षरशः घाम फुटत होता असे तो म्हणाला.
या दौर्यामध्ये भारताने इतिहास रचला होता, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताने २-१ ने जिंकली. ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची कामगिरी याआधी कोणत्याच आशियाई देशाने केली नव्हती. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने पहिली कसोटी ३१ धावांनी जिंकली. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना १४६ धावांच्या फरकाने जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.