
‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या रिपोर्ट नुसार बंगालचा वेगवान गोलंदाज अर्थात अशोक दिंडा व त्याचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणजेच राणादेव बोस यांच्यात जोरदार वाद झाले. दरम्यान दिंडाने बोस यांना शिवीगाळ केली जे की आता त्याला चांगलेच महागात पडणार आहे. शिविगाळ केल्या प्रकरणी दिंडाला संघातूम बाहेर करण्यात येणार असल्याची माहिती मिळाय आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू व बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी माहिती दिली की, ” आज प्रशिक्षणादरम्यान मी थोडा लवकर निघालो. त्यामुळे सदर प्रकार माझ्यासमोर घडला नसून जेव्हा मी घरी पोहचलो तेव्हा याबद्दल माहिती मिळाली. ही अतिशय दुर्भाग्यपूर्ण गोष्ट असून या गोष्टीची मी निंदा करतो.” त्याचबरोबर शेवटी अरुण लाल म्हणाले “दिंडाला आम्ही रणजी सामन्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.” चाहत्यांनी देखील या घटनेची निदा केली आहे. एखाद्या खेळाडूकडून चांगली खेळी खेळली जात नसेल तर प्रशिक्षक त्याच्यवर चिडतात, रागावतात, बोलतात, समजावतात मात्र त्यामुळे प्रशिक्षकांना शिवीगाळ करणे अयोग्य असं मत सर्व चाहते व्यक्त करीत आहेत.