Home खेळ स्पर्धा कॉमेंट्रेटर म्हणून संजय मांजरेकर यांची बीसीसीआयने केली हकालपट्टी

कॉमेंट्रेटर म्हणून संजय मांजरेकर यांची बीसीसीआयने केली हकालपट्टी

0

भारताचे माजी कसोटी क्रिकेटवीर आणि अनुभवी कॉमेंट्रेटर संजय मांजरेकर यांची बीसीसीआयच्या कॉमेंट्रेटर यादीमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या वन डे सामना पावसामुळे रद्द करण्यात आला मात्र या सामन्याच्या दरम्यान कॉमेंट्री करण्यासाठी सुनील गावस्कर, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि मुरली कार्तिक उपस्थित होते. परंतु यावेळी संजय मांजरेकर उपस्थित नसल्यामुळे चर्चाना उधाण येत होते ,यानंतर मुंबई मिररने दिलेल्या वृत्तात संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयच्या कॉमेंट्रेटर यादीमधून वगळण्यात आल्याचे सांगितले आहे.

भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या दिवस-रात्र मालिकेच्या दरम्यान संजय मांजरेकर यांनी रविंद्र जडेजावर टीका केली होती. “रवींद्र जडेजा हा एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत नाही, असे कधी तरी खेळणारे खेळाडू मला अजिबात आवडत नाहीत. त्याचबरोबर, तो कसोटी सामन्यात पूर्ण गोलंदाज आहे.५० षटकांच्या क्रिकेटसाठी मी प्लेइंग इलेव्हनमध्ये दुसऱ्या कोणत्या तरी फलंदाज किंवा कोणत्याही फिरकी गोलंदाजाचा समावेश करू इच्छितो, पण जडेजाचा नाही”, अशा शब्दात संजय मांजरेकर यांनी जडेजावर टीका केली होती.