Home खेळ स्पर्धा “धोनी भारतासाठी खेळणे शक्य नाहीच, लवकरच तो निवृत्ती घेईल ” : सुनील...

“धोनी भारतासाठी खेळणे शक्य नाहीच, लवकरच तो निवृत्ती घेईल ” : सुनील गावस्कर

0

भारताच्या क्रिकेट जगतात अल्पावधीतच लोकांच्या गळ्यामधील ताईत बनलेल्या काही खेळाडूंपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आपल्या यष्टीरक्षणासोबत तडाखेबंद फलंदाजीने भल्या भल्यांची झोप उडवणाऱ्या धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जवळपास शेवटच्या टप्प्यावर आली आहे असं एकूणच वातावरण निर्माण झालं आहे. तब्बल ९ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेला धोनी, आयपीएलमधून पदार्पण करत पुन्हा संघात येईल असं वाटत असतानाच कोरोनाव्हायरसमुळे आयपीएलसुद्धा होणार की नाही ही शंका निर्माण झाली आहे.दरम्यान ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेत धोनी संघात येईल असं मानलं जात असताना सुनील गावस्कर यांनी सध्या वेगळाच खुलासा केला आहे.

“महेंद्रसिंग धोनीने टी-20 विश्वचषक खेळावा अशी माझी नक्कीचं इच्छा आहे, परंतु हे होणे खूप अवघड आहे. संघ आता धोनीच्या पुढे गेला आहे. तो मोठी घोषणा करणारा व्यक्ती नाही. माझ्या मते आता तो शांततेत क्रिकेटला निरोप देईल.” धोनीचा भारताच्या टी-20 विश्वचषक संघात समावेश होईल की नाही याबद्दल बर्‍याच प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत. यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सांगितले होते की, आयपीएलची चमकदार मोहीम राबविल्यावरच 38 वर्षीय धोनीला वर्ल्ड कप संघात स्थान मिळवू शकेल.

धोनी चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) प्री-हंगाम शिबिरात नेट्समध्ये खूप मेहनत घेतली आहे, परंतु कोविड-19 मुळे आता स्पर्धा होणार की नाही यावर प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे, आता त्याला ओळख पटवून देण्याची संधी मिळणार का हे पाहणे बाकी आहे.