Home खेळ स्पर्धा “पाकिस्तानी खेळाडू ३० रन्स बनवले असतील तरी ते देशासाठी, भारतीय खेळाडू तर...

“पाकिस्तानी खेळाडू ३० रन्स बनवले असतील तरी ते देशासाठी, भारतीय खेळाडू तर फक्त स्वतःसाठी खेळतात” : इंझमाम उल हक

0

पाकिस्तानी खेळाडू हे नेहमीच भारतीय क्रिकेटपटूंना लक्ष्य करत आले आहेत. या दोन संघांमधली टशनही क्रिकेटचाहत्यांच्या पसंतीत उतरणारी असते. या दोन देशांमध्ये क्रिकेट मालिका होत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये द्वंद्व रंगलेलं पाहायला मिळते. त्यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक आणि रमीझ राजा यांची भर पडली आहे. यावेळी दोघांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीमधील अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यात भारताविरुद्धच्या सामन्यांच्या आठवणीही होत्या.

रमीझ राजा आणि इंझमाम यांनी 1992च्या आयसीसी वर्ल्ड कपमधील भारताविरुद्धच्या सामन्याबाबत चर्चा केली. 1992च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार इम्रान खान यांनी कशा प्रकारे संघाचे मनोबल उंचावले, यावरही इंझमाम म्हणाला. त्याने सांगितले,”इम्रान तांत्रिकदृष्ट्या चांगला कर्णधार नव्हता, परंतु संघातील बहुतेक खेळाडूंबद्दल त्याला चांगली माहिती होती. युवा खेळाडूंच्या मागे तो अतिशय खंबीरपणे उभा राहीला आणि त्यामुळेच तो सर्वोत्तम कर्णधार बनला. एखाद्या मालिकेत खेळाडू अपयशी ठरला, म्हणून तो त्याला संघाबाहेर करायचा नाही. तो त्या खेळाडूमध्ये विश्वास निर्माण करायचा. त्यामुळेच सर्व त्याचा आदर करायचे.”
या चर्चेत इंझमामने भारतीय खेळाडूंबाबत वादग्रस्त विधान केलं.

भारतीय फलंदाज वैयक्तिक शतकासाठी खेळायचे, तर पाकिस्तानी फलंदाजांच्या 30 आणि 40 धावा या संघासाठी असायच्या, असा दावा इंझमामने केला. तो म्हणाला,”आम्ही भारताविरुद्ध खेळायचो, तेव्हा त्यांच्या फलंदाजांची फौज ही कागदावर आमच्यापेक्षा वरचढ दिसायची. मात्र, आमचे फलंदाजांच्या 30 किंवा 40 धावा या संघासाठी असायच्या, तर भारताचे फलंदाज स्वतःसाठी शतक झळकवायचे. दोन देशांतील खेळाडूंमध्ये हा फरक आहे.”