Home खेळ स्पर्धा लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त विराटने आपली धमाकेदार फलंदाजी समर्पित केली अनुष्काला…

लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त विराटने आपली धमाकेदार फलंदाजी समर्पित केली अनुष्काला…

0

भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीने बुधावारी वेस्टइंडिज विरोधात धमाकेदार फलंदाजी केली. त्याच्या जोरदार फलंदाजीमुळे तो मॅन ऑफ दि सिरीज ठरला. मात्र आपल्या खेळीचं सर्व श्रेय त्याने पत्नी अनुष्काला समर्पित केलं आहे.

भारत वेस्टइंडिज दरम्यान बुधवारी झालेल्या 20 ट्वेन्टी मध्ये भारत 67 धावांनी विजयी झाला आहे. या विजयाचं सर्व श्रेय जातं ते कप्तान विराट कोहलीला कारण विराटने 29 चेंडूनमध्ये 70 धावा पटकावल्या ज्यात सात षटकार व 4 चौकारचा समावेश आहे. या पूर्वी झालेल्या 20 ट्वेन्टी मध्ये विराटने नाबाद राहून 94 धावा पटकावल्या ज्यामुळे तो मॅन ऑफ दि सिरीज ठरला आहे. त्याला हा किताब त्याच्या आणि अनुष्काच्या दुसऱ्या marriage anniversaryला मिळाल्याने विराटने आपल्या कामगिरीचं सर्व श्रेय भेट स्वरूपात अनुष्काला समर्पित केलं आहे.