Home खेळ स्पर्धा गौतम गंभीर अतिशय माजोरडा असून स्वतःला जेम्स बॉण्ड समजतो” : शाहिद आफ्रिदी

गौतम गंभीर अतिशय माजोरडा असून स्वतःला जेम्स बॉण्ड समजतो” : शाहिद आफ्रिदी

0


पाकिस्तानचा निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा त्याच्या आक्रमक स्वभावासाठी सदैव चर्चेत असतो. मात्र सध्या आफ्रिदी आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे.
आफ्रिदीने आपल्या Game Changer या आत्मचरित्रामध्ये भारताताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचा स्वभाव माजोरडा आहे असा उल्लेख केला आहे. गौतम गंभीर हा अतिशय सामान्य क्रिकेटर असला तरी तो स्वत:ला उगाचच महान समजतो. त्यामुळे तो कायम असा तोरा मिरवतो जसा की त्याच्यात डॉन ब्रॅडमन आणि जेम्स बाँड यांचा मिलाफच झालेला आहे, असं आफ्रिदीने म्हटलंय.
आफ्रिदीने केलेल्या टीकेला गौतम गंभीरनेसुद्धा प्रत्युत्तर दिलं आहे. 

“स्वतःचं वय माहिती नसलेला माणूस आज माझ्या विक्रमांबद्दल बोलतोय.खोटारड्या आणि संधीसाधू व्यक्तींसाठी मी असाच माजोरडा आहे “,अशा आशयाचं ट्विट गंभीरने केलं आहे.

काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचं वक्तव्य सुदधा केलं होतं.