Home खेळ स्पर्धा गंभीर दुखापतीमुळे हार्दिक पंड्या काही दिवस खेळाबाहेर

गंभीर दुखापतीमुळे हार्दिक पंड्या काही दिवस खेळाबाहेर

0

भारतीय क्रिकेट संघातील २५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे पुढील काही दिवस क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे अशी बातमी समोर आली आहे. याआधी काही वेळा खेळदारम्यान दुखापत होऊन पंड्या त्यातून सावरला आहे. पण ही दुखापत गंभीर असून त्यासाठी त्याला इंग्लंडमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागेल अशी शक्यता आहे असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. तरी यासाठी त्याला नेमके किती दिवस खेळातून बाहेर राहावे लागणार हे अजून कळू शकले नाही.

मागील वर्षीच्या आशिया स्पर्धेत पंड्या गंभीर जखमी झाला होता. त्यातून सावरून तो काही सामने खेळला होता. यावर्षीच्या आशिया स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात चेंडू टाकतांना त्याला पाठीत लचक भरली होती. ही दुखापत देखील गंभीर स्वरूपाची असून त्याला मैदानातून स्ट्रेचरवरून न्यावे लागले. तेव्हापासून त्याला पाठीच्या खालच्या भागात कायम दुखायला लागले होते. याच कारणाने पंड्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. तसेच पुढील बांग्लादेशासोबतचा सामना देखील पंड्या खेळू शकणार नाही. जर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली तर पुढील ५ ते ६ महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाही. त्यामुळे त्याला शस्त्रक्रियेची गरज पडू नये व पुन्हा खेळता यावे अशी प्रार्थना क्रिकेटप्रेमी करत आहेत.