Home खेळ स्पर्धा हार्दीक पांड्याची दमदार कामगिरी, २० षटकार मारत काढल्या ५५ चेंडूत १५८...

हार्दीक पांड्याची दमदार कामगिरी, २० षटकार मारत काढल्या ५५ चेंडूत १५८ धावा!!

0

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या त्याच्या तडाखेबाज कामगिरीमुळे सर्वानाच  परिचयाचा आहे,पण  त्याने आज डी  वय पाटील स्टेडियम वर खेळताना तुफान फटकेबाजी केली त्याने २० षटकार मारत ५५ चेंडूत त्याने नाबाद १५८ धावांची खेळी केली . 


नवी मुंबई च्या दि वय पाटील स्टेडियम मध्ये दि वय पाटील टी २० क्रिकेट स्पर्धा सुरु आहेत आज सकाळी रिलायन्स विरुद्ध BPCL यांच्या लढतीत रिलायन्स कडून खेळात असताना हार्दिक पंड्यानी हा विक्रम नोंदवला.त्याच्या धावांच्या जोरावरच रिलायन्स  संघाने २३८ धावांचा डोंगर BPCL  समोर उभा केला . या धावांचा पाठलाग करताना BPCL  संघ १३४ धावत पूर्ण बाद झाला आणि रिलायन्स ने त्यांच्यावर दणदणीत विजय मिळवला.हार्दीक पंड्या हा स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापती मुले भारतीय संघाच्या बाहेर होता, पण जेव्हापासून तो दुखापतीतून बाहेर आला आहे तो गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरत आहे या आधीच्या लढतीत सुद्धा त्याने ३७ चेंडूत शतक ठोकल्याने तो चर्चेत आला होता.

हार्दिक पंड्याने टी २० स्पर्धेमध्ये ४ सामन्यात ३८ षटकार मारत ३४७ धांवा केल्या आहेत. पहा