
महेंद्रसिंह धोनीला वार्षिक करारयादीतून बीसीसीआयने वगळले आहे. परिणामी देशात एकच खळबळ उडाली. मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळत आहे. बीसीसीआयच्या करारयादीतून धोनीला वगळण्यात भाजपचा हात असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत. विश्वचषक स्पर्धेनंतर तो भारतीय संघाकडून खेळलेला नाही. कसोटी क्रिकेटमधून त्याने कधीच निवृत्ती घेतली व त्यानंतर सीमेवरील जवानांना भेट देखील दिली. लोकमतच्या रिपोर्ट नुसार क्रिकेटनंतर धोनी राजकारणात उतरेल असा भाजपचा अंदाज होता. त्या अनुषंगाने भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी तेव्हा धोनीची भेटही घेतली होती पण धोनी राजकारणात आलाच नाही. परिणामी त्याला बीसीसीआयने सेंट्रल करारातून वगळले असा दावा काँग्रेसच्या सोशल मीडिया समन्वयक गौरव पांधी यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरूनही तोफ डागली. त्याचं ट्विट पुढील प्रमाणे…
“झारखंड निवडणुकीत भाजपच्या पदरात अपयश आलं व सत्ता गेली. त्याचाच राग भाजपानं धोनीवर काढला असं पांधी यांनी म्हटलं आहे. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणतात, ”धोनीनं झारखंड निवडणुकीत भाजपात प्रवेश करावा व निवडणुक लढावी यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र, धोनीने नकार दिला व क्रिकेटला प्राधान्य दिले. पुढे त्याला प्रचारासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र तेव्हाही त्याने नकारच दिला होता. आणि आता त्याच गोष्टीचा परिणाम म्हणून बीसीसीआयनं त्याला सेंट्रल करारातूनच वगळलं आहे.”