Home खेळ स्पर्धा जाँटी ऱ्होड्सच्या यादीत “या” भारतीय खेळाडूला मिळाले स्थान !

जाँटी ऱ्होड्सच्या यादीत “या” भारतीय खेळाडूला मिळाले स्थान !

0

 

प्राईम नेटवर्क : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज जाँटी ऱ्होड्स हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे यात वादच नाही. चपळ क्षेत्ररक्षण आणि अचूक झेल टिपण्यात त्याचा हात कोणी धरूच शकत नाही. १९९२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या रन आऊटनंतर त्याच्या नावाचीच हवा राहिली. त्यानंतर त्याने अनेक अविश्वसनीय झेल टिपले आणि अनेक रन आऊटही केले. आयसीसीच्या एका कार्यक्रमात बोलत असताना जॉन्टी ऱ्होड्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले सर्वोत्तम ५ क्षेत्ररक्षक सांगितले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या यादीत भारताच्या फक्त एकाचं खेळाडूला स्थान मिळालय.

ऱ्होड्सच्या मते ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँड्रू सायमंड्स हा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आहे. सायमंड्स हा सीमारेषेवर आणि तीस यार्ड सर्कलच्या आत कुठेही व्यवस्थित चेंडू अडवू शकतो असं ऱ्होड्स म्हणाला. यानंतर जॉन्टीने आपले दक्षिण आफ्रिकी सहकारी हर्षेल गिब्ज आणि एबी डीव्हिलीयर्स याचसोबत इंग्लंडचा माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूडलाही सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हटलं आहे.

अखेरीस जाँटीने भारताच्या सुरेश रैनाची पाचव्या स्थानी निवड केली. भारतातील कमी गवत असलेल्या खेळपट्टीवर क्षेत्ररक्षण करणे नेहमी आव्हानात्मक होते, परंतु रैना अगदी सहजतेने ते करून जायचा. स्लीपमध्येही त्याच्या क्षेत्ररक्षणाला तोड नाही, असे जाँटी म्हणाला. भारतामध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक शोधणं कठीण असल्याचंही जॉन्टीने मान्य केलं. मात्र भारतात आणि भारताबाहेर केलेल्या कामगिरीच्या जोरावर सुरेश रैना सर्वोत्तम असल्याचंही जॉन्टीने म्हटलंय.