
क्रिकेटमध्ये पंचाचा निर्णय खेळी बदलू शकतो मग तो निर्णय चुकीचा असो वा बरोबर. काल पंचांच्या हातून दोन निर्णय चुकीचे दिले गेले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि द्विशतकवीर मयांक अगरवाल यांच्याबाबत हे चुकीचे निर्णय दिले गेले. परिणामी शेवटी दोन वेळा पंचांना या चुकीच्या निर्णयाची माफी मागावी लागली.
सर्वप्रथम कोहली फलंदाजी करीत असतांना बांगलादेशच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. पण मैदानावरील पंचांनी तो नाबाद असल्याचे सांगितले. जेव्हा बांगलादेशने डीआरएस घेतला. त्यामध्ये चेंडू स्टम्पला लागल्याचे दिसत होते. थर्ड अंपायरने कोहलीला आऊट असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर पंचांनी मयांकला ८२ धावांवर असताना बाद ठरवले होते. मेहंदी हसनच्या गोलंदाजीवर बांगलादेशने मयांकविरोधात LPW अपील केले. मैदानावरील पंचांनी मयांकला बाद ठरवले. पण मयांकने यावेळी डीआरएस घेतला आणि त्यामध्ये तो नाबाद ठरवला. अगरवालने या सामन्यात द्विशतकी खेळी साकारली. एकंदरीत एकदा नाही तर चक्क दोन वेळा मैदानावरील पंचाचा निर्णय चुकला व परिणामी त्यांना माफी मागावी लागली.