Home खेळ स्पर्धा आशिया क्रिकेट चषकात भारतीय संघ विजयी, मुंबईच्या अथर्वचा विजयात महत्वाचा वाटा

आशिया क्रिकेट चषकात भारतीय संघ विजयी, मुंबईच्या अथर्वचा विजयात महत्वाचा वाटा

0

कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारताच्या १९ वर्षांखालील संघाने बांगलादेश विरोधातील सामन्यात बाजी मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आशियाई क्रिकेट चषक जिंकण्याची भारताची ही सातवी वेळ आहे. या विजयात मुंबईच्या अथर्व अंकोलेकर याचा अतिशय महत्वाचा वाटा ठरला, हे आवर्जून सांगायलाच हवं.

आशिया क्रिकेट चषकात बांगलादेशासमोर १०६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होये बांगलादेश ते सहज पूर्ण करेल असे सर्वांना वाटत होते. मात्र बांगलादेशाला शेवटच्या ७ धावांची आवश्यकता असतांना भारतीय संघाचा कर्णधार ध्रुव जुरेल याने अथर्वला गोलंदाजी दिली आणि खेळच पालटला. सुरवातीला भारत हरणार असे सर्वांना वाटले पण अथर्वने बांगलादेशच्या २ फलंदाजांना बाद करून अगदी अंतिम टप्प्यात भारताला विजय मिळवून दिला आणि बांगलादेश १०१ धावांवर ऑल आउट झाला. संपूर्ण खेळात अथर्वने २८ धावांत ५ विकेट्स घेतल्या. अथर्वच्या या कामगिरीबद्दल त्याचे भारतात सर्वस्त्र कौतुक केले जात आहे. तसेच भारतीय संघाच्या या अविश्वसनीय विजयाबद्दल संघाला विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.