
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगच्या १३व्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार असून सामने सुरू होण्याची तारीख जाहीर झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्यात आयपीएल टीम्ससाठी खेळाडूंचा लिलाव झाला व कोणता खेळाडू कोणत्या संघाबरोबर खेळणार हे निश्चित झाले. तेव्हापासूनच क्रिकेटप्रेमींना आयपीएलची तारीख जाहीर होण्याची ओढ लागली होती.
मीडिया रिपोर्टनुसार २९ मार्च २०२० पासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून आयपीएल २०१९ चे विजेते मुंबई इंडियन्स या हंगामाचा श्रीगणेशा करणार आहेत. मात्र मार्च एप्रिल दरम्यान ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यात टी-20 सामना असल्यामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना या देशांचे खेळाडू मुकणार आहेत असे मीडिया न्यूजवरून समजले.