Home आरोग्य भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा जोगिंदर शर्मा उतरला रस्त्यावर, फिरणार्यांना देतोय चांगलाच...

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारा जोगिंदर शर्मा उतरला रस्त्यावर, फिरणार्यांना देतोय चांगलाच चोप!

0


भारताला २००७ मधील T-20 विश्वचषक जिंकून देणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा आज रस्त्यावर उतरला, लॉकडाउन नंतर मोकाट फिरणाऱ्या लोकांना तो चांगलाच चोप देत आहे.

काल पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवस पूर्णपणे लॉकडाउन केले असल्याचे सांगितले आणि सर्व नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन केले. पण तरीसुद्धा काही नागरिक उपद्व्याप देत पोलिसांना त्रास देत आहेत आणि याच पार्शवभूमीवर भारताचा माजी गोलंदाज जोगिंदर शर्मा रस्त्यावर उतरला असून त्याने नागरिकांना चोप द्यायला सुरुवात केली आहे.ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात जोगींदरच्या अखेरच्या षटकानं भारताला जेतेपद पटकावून दिले होते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर जोगींदरनं हरयाणा पोलीस जॉईन केले आणि तेथे तो पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे. त्यामुळेच तो रस्त्यावर उतरून लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे.,

आतापर्यंत जगभरात 4, 22,829 कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 18, 907 जणांचा मृत्यू सुद्धा झाला आहे.कोरोनाला हरवण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहे. भारतातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 21 दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला. यामुळे लोकांना घरत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी डॉक्टर आणि पोलिसांना बाहेर पडावे लागत आहे.