Home खेळ स्पर्धा मोदींच्या जनता कर्फ्युच्या निर्णयावर केविन पीटरसनचे हिंदीत ट्विट!

मोदींच्या जनता कर्फ्युच्या निर्णयावर केविन पीटरसनचे हिंदीत ट्विट!

0

कोरोना व्हायरसचा दोन्ही हातांनी मुकाबला करण्यासाठी सगळे जग एकजुट झाले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या २२ मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. भारताच्या या एकजुटीचं इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन याने कौतुक केलं आणि तेही विशेष म्हणजे हिंदी भाषेत. कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जग थांबलं आहे. क्रीडाविश्वालासुद्धा याची झळ सहन करावी लागली आहे. अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) आणि इंग्लिश प्रीमिअर लीग ( ईपीएल) या दोन मुख्य स्पर्धाही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.

मोदीजींनी काल राष्ट्राला संबोधून भाषण देत सर्वाना कोरोना शी लढण्याचे आवाहन केले मोदींनी प्रथमच कोरोना व्हायरस संबंधीत देशासमोर आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी १३० कोटी भारतीयांना योग्य ती काळजी घेण्याचं आणि येत्या रविवारी जनता कर्फ्यूचं आवाहन सुद्धा केलं आहे. मोदींच्या या आवाहनचे भारतीय क्रीडापटूंकडूनही कौतुक झालं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, आर अश्विन, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, गौतम गंभीर, रवी शास्त्री, कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक, बबिता फोगाट यांच्यासह अनेकांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती केली.

त्यात शुक्रवारी इंग्लडचा धडाकेबाज फलंदाज केविन पीटरसन यानेही एक ट्विट केले. एका कार्यक्रमाच्या चित्रिकरणासाठी पीटरसन काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आला होता. त्यानंही भारतीयांसाठी एक ट्विट केलं. तो म्हणाला,”नमस्ते इंडिया.कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी आपण एकत्र यायला हवं. सर्वांना आपापल्या सरकारनं केलेल्या आव्हानाचं पालन करायला हवं. काही दिवसांसाठी घरीच राहा, आपली हुशारी दाखवण्याची हीच ती वेळ. तुम्हा सर्वांना खुपखुप प्रेम.” पीटरसननं हे ट्विट हिंदीतून केलं.

केपीच्या या ट्विटला पंतप्रधानांनीही रिप्लाय दिला आणि म्हटलं की, “विस्फोटक फलंदाज आपल्याला काही सांगत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आपणही एकत्र येऊया.”पंतप्रधानांच्या या ट्विटवर केपीनं त्वरीत रिप्लाय दिला. त्यानं मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तो म्हणाला,”धन्यवाद मोदीजी, तुमचं नेतृत्वही विस्फोटक आहे.”