Home खेळ स्पर्धा पांढऱ्या दाढी आणि केसांमधील फोटोमुळे सगळे म्हणतात महेंद्रसिंह धोनी झाला म्हातारा

पांढऱ्या दाढी आणि केसांमधील फोटोमुळे सगळे म्हणतात महेंद्रसिंह धोनी झाला म्हातारा

0

धोनी ने त्याची मुलगी जिव्हा च्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये धोनी त्याच्या लेकीबरोबर खेळताना दिसत आहे.

हा व्हिडिओ त्याने टाकल्यानंतर त्यातील लुक मूळे धोनी अक्षरशः सोशल मीडिया वर व्हायरल झाला. धोनी यामध्ये दाढी आणि डोक्यावरचे केस हे पुर्ण पांढरे झाले आहेत. त्यामुळे धोनीचे खरंच वय झाले आहे का असा प्रश्न नेटकर्यांना पडला.

एकीकडे चाहत्यांना धोनीच्या म्हातारपणामुळे त्याच्या करियर चे काय होणार याची लागली असताना, धोनीच्या आईची प्रतिक्रिया मात्र मन आनंदित करणारी आहे. धोनीच्या आई देवकी ह्या म्हणतात, ” हो मी बघितला त्याचा फोटो, तो काही दिसतोय तेवढा म्हातारा अजिबात झालेला नाही आहे. कुठल्याही आईला त्याचा मुलगा म्हातारा झाला हे पटणे शक्यच नाही!”

दुसरीकडे मात्र धोनीच्या या पोस्ट मूळे सोशल मीडिया वर अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत. कोणाच्या मते धोनी आता ठार म्हातारा झाला आहे तर कोणी कोणी तर म्हटले आहे की दहा वर्षे देशाची सेवा केल्यानंतर हे असंच होणार आपण काळजी न करता, धोनीचे आभार मानायला हवेत!