Home खेळ स्पर्धा रोहित-राहुलच्या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांना झोडले : रोहितने तोडले धोनी व कोहलीचे रेकॉर्ड्स!

रोहित-राहुलच्या जोडीने विंडीजच्या गोलंदाजांना झोडले : रोहितने तोडले धोनी व कोहलीचे रेकॉर्ड्स!

0

दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने विंडीजला चांगलंच झोडलं आहे. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावा अधिक भक्कम केल्या. धुवादार खेळी खेळत भारताने विंडीजला ३८८ धावांचं आव्हान दिलं आहे.

दुसऱ्या वन-डे सामन्यात रोहित शर्माने मैदानात चौकार-षटकारांची रतीबच लावली होती. परिणामी धोनी आणि विराटला मागे टाकट रोहित पुढे निघून गेला आहे. आता वेस्ट इंडिज विरोधात वन-डे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित सर्वात अव्वल स्थानी पोहचला आहे. आतापर्यंत वेस्ट इंडिजविरोधात वन-डे सामन्यात विराटने २५ तर धोनीने २८ षटकार ठोकले आहेत. मात्र या दोघांना मागे टाकत रोहित शर्माने २९ षटकार मारत वन-डे कारकिर्दीतलं २८ वं शतक झळकावलं.