Home खेळ स्पर्धा अखेर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड पक्की!

अखेर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड पक्की!

0

गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची निवड होणार असल्याची चर्चा चाललेली होती. या गोष्टीचा अखेर निकाल लागला असून सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच गांगुलीच्या विरोधात इतर कोणीही नसल्याने तो बिनविरोध निवडून आला आहे.

काल १४ ऑक्टोबरला गांगुलीने मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतरच्या निवड प्रक्रियेत बरेच राजकारण झाले. परंतु शेवटी गांगुलीची निवड करण्यात आली. तब्बल ६५ वर्षांनंतर भारतीय संघाचा कर्णधार बीसीसीआयच्या अध्यक्षपदी आला आहे. आज अध्यक्षपदासाठी निवड पक्की झाल्यावर मुख्यालयात इतर सहकाऱ्यांबरोबरचा फोटो ट्विटरवर पोस्ट करत सगळ्यांचे आभार मानले.