Home खेळ स्पर्धा शोएब अख्तर पैशाचे आमिष तू आम्हाला दाखवू नको : कपिल देव

शोएब अख्तर पैशाचे आमिष तू आम्हाला दाखवू नको : कपिल देव

0

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वी भारताने पाकिस्तानला कोरोनाशी लढा देण्यासाठी सहकार्य करावे आणि पैशांच्या उभारणीसाठी भारत-पाकिस्तान सामने आयोजित करावे असे विधान केले होते. यावर भारताचे माजी कर्णधार आणि देशाला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कपिल देव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.कपिल देव यांनी पैशाचे आमिष आम्हाला दाखवू नको असे म्हणत शोएब अख्तरला झापले आहे.

काेराेना व्हायरसवरील उपचारासाठी आमच्याकडे पुरेसे पैसे आहेत. त्यामुळे आम्हाला आर्थिक अडचण अजिबात नाही. यातूनच काेणत्याही प्रकारच्या आर्थिक मदतीसाठी भारत-पाकिस्तान सामन्यांचे आयाेजन करण्यात येऊ नये, अशा शब्दांत कपिल देव यांनी अख्तरला चांगलेच सुनावले आहे.

“कोरोना महामारीच्या विळख्यामध्ये सापडल्याने पाकिस्तान आणि भारतातील नागरिकांना याची मोठ्या प्रमाणात बाधा झाली आहे. या सर्वांच्या उपचारासाठी माेठ्या प्रमाणात खर्चाची गरज आहे. त्यासाठी आता भारत पाकिस्तान या दाेन्ही संघांचे तीन सामने जित करण्यात यावेत. यातून जमा झालेल्या पैशाची देणगी काेराेनाग्रस्तांना देण्यात यावी”, असा सल्ला पाकिस्तानचा माजी वेगवान गाेलंदाज शाेएब अख्तरने दिला हाेता. मात्र, त्याला माजी कर्णधार कपिल देव यांनी चांगलीच चपराक लावली.