Home खेळ स्पर्धा धीम्या गतीने गोलंदाजी विंडिजच्या खेळाडूंना पडली महागात, ८० टक्के मानधन दंड म्हणून...

धीम्या गतीने गोलंदाजी विंडिजच्या खेळाडूंना पडली महागात, ८० टक्के मानधन दंड म्हणून कपात

0

पहिल्या एकदिवसीय सामन्यात विंडिजने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. मात्र हा विजय धीम्या गतीने गोलंदाजी केल्याने विंडिजच्या खेळाडूंना महागात पडला आहे. ‘न्यूज 18 लोकमत’ च्या रिपोर्ट नुसार विंडिजवर आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार दंड आकारण्यात आला असून आयसीसी मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी विंडिज संघाला हा दंड केला आहे.

अधिक मिळालेल्या माहिती नुसार, पंच नितिन मेनन व शॉन जॉर्ज, तृतीय पंच रोडनी टकर व चतुर्थ पंच अनिल चौधरी यांनी विंडिजने धीम्या गतीने गोलंदाजी केल्याचा आरोप सामन्यादरम्यान केला होता. परिणामी निर्धारीत वेळेत चार षटके कमी टाकल्यामुळे प्रत्येक षटकामागे २० टक्के दंड आकारला जातो. त्यानुसार विंडिजच्या खेळाडूंना चार षटकांसाठी ८० टक्के मानधन दंड म्हणून द्यावं लावलं. सामन्यानंतर स्वतः विंडिजचा कर्णधार पोलार्डने देखील आपली चूक मान्य करून दंडही स्वीकारला होता. त्यामुळे आयसीसीकडूनही कुठली सुनावणी होणार नाही अशी माहिती मिळत आहे.