Home खेळ स्पर्धा कमेंट्री करतांना गावस्करांची जीभ घसरली; विराट अनुष्काबद्दल केले आक्षेपार्ह विधान

कमेंट्री करतांना गावस्करांची जीभ घसरली; विराट अनुष्काबद्दल केले आक्षेपार्ह विधान

0

काल अर्थात २४ सप्टेंबरला झालेल्या आयपीएलच्या आरसीबी विरुद्ध पंजाबच्या सामन्यात आरसीबीचा मोठा पराभव झाला. या मॅचदरम्यान कमेंट्री करतांना सुनील गावस्कर यांनी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवर आक्षेपार्ह विधान केले. या विधानामुळे गावस्करांवर सोशल मीडियावर संतप्त टीका केल्या जात आहेत.

कालच्या सामन्यात पंजाबने दमदार खेळी दिली. मात्र त्यासोबतच आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने मोठ्या चुकाही केल्या. के एल राहुल फलंदाजी करत असतांना क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने त्याच्या दोन कॅच सोडल्या. तसेच फलंदाजी करतांनाही फक्त एक रन काढून तो बाद झाला. या त्याच्या अपयशामुळे आरसीबीला पराभव पत्करावा लागला. कोहली बाद झाल्यावर माघारी परतत असतांना गावस्करने कमेंट्रीमध्ये एक वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले की ‘इन्होंने लॉकडाउन में तो बस अनुष्का की गेंदों की प्रैक्टिस की है।’ या विधानामुळे अनुष्का शर्मा तसेच विराटचेही चाहते भडकले व गावस्करांवर जोरदार टीका केली. तसेच महिलांबद्दल असे बोलणाऱ्या गावस्करांना कमेंट्रीवरून काढून टाकावे अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे.

परंतु त्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात विराट व अनुष्का घराच्या बाहेर क्रिकेट खेळत आहेत व अनुष्का गोलंदाजी करत आहे. या व्हिडिओवरून काही लोकांनी गावस्करांचे समर्थन करत सांगितले की त्यांनी ते विधान या व्हिडिओवर केले होते.