Home खेळ स्पर्धा या भारतीय तरुणाने मोडला उसेन बोल्टचा रेकॉर्ड ; ट्विटर युजरचा दावा

या भारतीय तरुणाने मोडला उसेन बोल्टचा रेकॉर्ड ; ट्विटर युजरचा दावा

0

धावण्यामध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता असलेला उसेन बोल्ट जगातील सर्वात वेगवान धावपटू आणि वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर अनेक विश्वविक्रम केले आहेत. त्याचा ९.५८ सेकंदांमध्ये १०० मीटर्स अंतर धावण्याचा विश्वविक्रम कोणी कधीच तोडू शकणार नाही असा दावा करण्यात आला होता. मात्र एका भारतीय तरुणाने ९.५५ सेकंदांत १०० मीटर अंतर पूर्ण करून उसेन बोल्टचा हा विश्वविक्रम तोडला असल्याचा एका ट्विटर युजरने दावा केला आहे.

सामना च्या मीडिया न्यूजनुसार या तरुणाचे नाव श्रीनिवास गौडा असे असून तो कर्नाटकातील मोडाबीद्री भागातील स्थानिक रहिवासी आहे. ‘कंबाळा’ नावाच्या एका म्हशींच्या शर्यतीमध्ये धावून श्रीनिवासने हा विक्रम केला आहे. पाणी भरलेल्या शेतात म्हशींसोबत धावून १४२.५ मिटर्सचे अंतर श्रीनिवासने केवळ १३.६२ सेकंदांत पूर्ण केले. त्यातील १०० मीटर्सचे अंतर पार करण्यासाठी त्याला केवळ ९.५५ सेकंद लागले अशी माहिती ट्विटर युजरने दिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाणी भरलेल्या शेतात म्हशींसोबत धावूनही इतक्या कमी वेळात इतके अंतर पार केल्याने सगळीकडे या तरुणाचे कौतुक होत आहे.