Home खेळ स्पर्धा “तुला मानलं रे ठाकूर” विराटने केलं अस्सल मराठीत ट्विट : चाहत्यांची जिंकली...

“तुला मानलं रे ठाकूर” विराटने केलं अस्सल मराठीत ट्विट : चाहत्यांची जिंकली मनं!

0

काल झालेल्या भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय सामन्यात विराटनं 85 धावांची जोरदार खेळी खेळली; ज्यामुळे भारतानं हा सामना 4 विकेटने जिंकला. सोबतच तीन सामन्यांची ही मालिका 2-1 ने आपल्या बाजूने वळवली आहे. सामन्यानंतर आज सकाळी विराटने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक फ़ोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोपेक्षा जास्त त्याने लिहिलेल्या कॅप्शनची जास्त चर्चा होत आहे कारण विराटने मराठीत म्हटलं आहे, “तुला मानलं रे ठाकूर”

विराटनं त्याच्या ट्विटर खात्यावरून क्रिकेटर शार्दुल ठाकूरसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. शार्दूलनेही मागील सामन्यांमध्ये दमदार खेळी खेळत सर्वांना अवाक केलं. त्याच्या याच दमदार खेळाचं मराठीत कौतुक करत विराटने आपल्या ट्विटला कॅप्शन देताना लिहिलं आहे की, ‘तुला मानलं रे ठाकूर.’ क्रिकेट प्रेमींना हे कॅप्शन फारच आवडलं असून चाहते विराटचं भरभरून कौतुक करीत आहेत. विशेषतः महाराष्ट्रात विराटचं हे ट्विट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.