Home खेळ स्पर्धा “कोरोना असो की नसो भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट दौरा होणारचं” : BCCI

“कोरोना असो की नसो भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट दौरा होणारचं” : BCCI

0

भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या साठी BCCI ने ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला आश्वस्त केले आहे.

भारताचा हा ऑस्ट्रेलिया मधील ट्राय सिरीज क्रिकेट दौरा T20 सामन्याने ऑक्टोबर मध्ये आरंभ होईल आणि डिसेंबरमध्ये ४ टेस्ट सामने खेळवत याचा समारोप होईल. हे सामने कोरोना विषाणू मुळे उद्भवलेल्या हवाई वाहतूक बंदी आणि ती केव्हांपर्यंत राहील याची आशंका असल्यामुळे रद्द होतात की काय अशी चिंता खेळाडूंनी व्यक्त केली होती.

BCCI चे कोषाध्यक्ष धुमाळ यांनी सांगितले की, ” भारतीय खेळाडू हे सामना होण्याच्या एक दिवस अधिपर्यंत स्वतःला Isolation मध्ये ठेवण्याचं काम पडलं तरि ते करू, पण आगामी ऑस्ट्रेलिया दौरा हा रद्द होऊ देणार नाही, खेळ परत पहिल्यासारखे सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे”

हा दौरा म्हणजे फक्त क्रिकेट नसून या दौऱ्यामधून ऑस्ट्रेलिया बोर्डाला ३०० मिलियन डॉलर्स एवढा प्रचंड निधी मिळतो आणि हा निधी मिळाल्यावर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे सगळे आर्थिक अडथळे दूर होतील असे मत ऑस्ट्रेलिया चे कर्णधार टीम पैन यांनी सांगितले.