Home तंत्रज्ञान गुगलच्या ‘tangi’चे टिकटॉकला आव्हान; टिकटॉकचे मार्केट घसरण्याची शक्यता

गुगलच्या ‘tangi’चे टिकटॉकला आव्हान; टिकटॉकचे मार्केट घसरण्याची शक्यता

0

भारतातील जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना, विशेष करून तरुणांना मजेदार व्हिडिओचे वेड लावलेल्या टिक-टॉकला गुगलने मोठा प्रतिस्पर्धी आणला आहे. टिक-टॉकने गेल्या दोन वर्षांपासून भारतीयांना व्हिडिओचे वेड लावले असले तरी गुगलने शॉर्ट व्हिडिओज साठी बनवलेल्या ‘tangi’ या ऍपमुळे टिक-टॉकचे मार्केट कमी होण्याची शक्यता आहे.

लोकमतच्या रिपोर्टनुसार गुगलचे ‘टँगी’ हे ॲप सध्या ॲप्पल प्लेस्टोअरवर आणि वेबसाईटवर उपलब्ध झाले असून अँड्रॉइडसाठी अर्थात गुगल प्लेस्टोअरवर कधी उपलब्ध होईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या ॲपचा इंटरफेस थोडाफार इन्स्टाग्राम आणि पिंटरेस्ट सारखा आहे. यात ६० सेकंदांचा व्हिडीओ बनवून अपलोड करण्याची तसेच व्हिडिओवर कमेंट करण्याचाही ऑप्शन आहे. आर्ट, फॅशन, कुकिंग, ब्युटी, लाइफस्टाइल अशा विविध कॅटेगरी या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. टिकटॉकपेक्षा किंचित वरचढ असल्याने हे ॲप कमी कालावधीत चांगलेच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.