Home तंत्रज्ञान मुंबई आयआयटीने शोधलय टी.बी.वर नवे औषध !

मुंबई आयआयटीने शोधलय टी.बी.वर नवे औषध !

0

प्राईम नेटवर्क : क्षयरोगावर (टी.बी.) विविध ठिकाणी संशोधन सुरू असले तरी या रोगाचे मूळापासून निमूर्लन करु शकेल असे औषध अजूनही बनले नाही. मात्र मुंबई आयआयटीने केलेल्या संशोधनात या रोगावर प्रभावी असे औषध शोधले आहे. रिफामायसीन हे क्षयरोगावर वापरल्या जाणार्‍या दोन महत्वाच्या औषधांपैकी एक आहे. जे क्षयरोगाच्या विषाणूंवर मात करते. क्षयप्रतिबंधक रिफामायसीन हे औषध इतर औषधांसह वापरल्यास रुग्णाच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते.

हे संशोधन सूक्ष्मजीवशास्राच्या फ्रांटीयर या नियतकालिकात प्रसिध्द करण्यात झाले आहे. मुंबई आयआयटीच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका सारिका मेहरा आणि त्यांची पीएचडी करत असलेली विद्यार्थिनी येशा पटेल या दोघीनी मिळून हे संशोधन केले आहे. क्यूमिन हैड्रोजन पेरॉक्साईड या औषधामध्ये रिफामसीन मिसळून ते क्षयरुग्णाला दिले असता रुग्णामध्ये सुधारणा दिसून आलीच शिवाय या औषधाचा कोणताही बाह्य परिणाम दिसून आला नाही.

अन्‍न आणि औषध प्रतिबंधक विभागाने मान्यता दिलेल्या इतर औषधांमध्ये हे मिश्रण वापरल्यास तेही क्षयरोगावर उपयुक्‍त ठरू शकते, असा दावा करण्यात आला आहे, मात्र त्याला अद्याप मान्यता देणे बाकी आहे. एकदा हे मिश्रण फ्रांटियरमध्ये प्रसिद्ध झाले तर पुढील प्रक्रियेसाठी मंजुरी दिली जाईल.अनेक देशांमध्ये या उपचाराद्वारे बरे होण्याचे प्रमाण 50% आहे.

क्यूमिन हैड्रोजन पेरॉक्साईड क्षयरोगाचे विषाणू रोखण्यास मदत करते. सध्या क्षयरुग्णाला देण्यात येणार्‍या औषधापेक्षा 16 पटीने कमी मात्रेमध्ये हे औषध दिल्यास ते तितकेच प्रभावी ठरू शकते. रुग्णामध्ये प्रतिकारशक्‍ती वाढवण्यास ते अतिशय उपयुक्‍त ठरते. औषधांचा किमान 2 वर्षांचा कोर्स पूर्ण करावा लागतो.

मुंबई आयआयटीने शोधलेले हे नवे औषधच नाही तर ती एक उपचाराची पद्धतीही आहे, असे प्रा.सारिका मेहरा यांनी सांगितले.