Home तंत्रज्ञान व्हाट्सएपला झाला टेक्निकल लोचा, चेक करा हे फिचर झालेत गायब!

व्हाट्सएपला झाला टेक्निकल लोचा, चेक करा हे फिचर झालेत गायब!

0

जगभरामध्ये कोट्यवधी लोक आज व्हाट्सएपच्या टेक्निकल लोच्यामुळे गोंधळात पडले आहेत, आपल्या नित्याच्या वापरातील व्हाट्सप मध्ये एकाएकी बग घुसला आणि कुणालाच कुणाचे लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटस दिसू नाही लागले!

व्हॉट्स अ‍ॅपवरील लास्ट सीन बंद झाल्यानं अनेकांनी सेटिंग्समध्ये जाऊन त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे सेटिंग्स बदलता येत नसल्याचा अनुभव अनेकांना आला. ‘फेल्ड टू अपटेड प्रायव्हसी सेटिंग्स.प्लीज ट्राय अगेन लेटर’ असा मेसेज सेंटिग्स बदलताना येत आहे. ही समस्या नेमकी कधीपासून निर्माण झाली आणि ती कधीपर्यंत सोडवली जाईल, याबद्दल अद्याप तरी व्हॉट्स अ‍ॅपनं कोणतीही माहिती दिलेली नाही.

शुक्रवारी रात्रीपासून व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याचे लास्ट सीन (last seen) दिसत नसेल तर आपण अनइन्टॉल करण्याची गरज नाही. ही समस्या तुम्हालाच नाही जगभरातील कोट्यवधी युझर्सना आली आहे. शुक्रवारी संध्याकाळपासूनच ही समस्या जाणवत असल्याचं अनेकांनी ट्वीट करून माहिती दिली. त्यानंतर कंपनीकडून काही तांत्रिक अडचणी असल्याचं सांगण्यात आलं.