
प्राईम नेटवर्क : मंडळी या जगात असा कोणी माणूस नाही ज्याला सोशल मीडिया, व्हॉट्सएप,फेसबुक,ट्विटर हे शब्दच माहिती नसतील. आता तुम्ही म्हणाल याला बोलणं म्हणायचं का बोलण्याचा बा ? अहो व्हॉट्सएप म्हणजे श्वास, फेसबुक म्हणजे औषध आणखीन बरचं काही. आता हे सोशल मीडिया पुराण बंद करून मूळ मुद्द्यावर येतो.
मंडळी तुम्हाला आठवतं का मध्यंतरी व्हॉट्सएपवर स्टिकर्सचा समावेश करण्यात आला होता. त्यातल्या पंटर लोकांनी लगेच स्टिकर्स डाउनलोड करून पाठवायला सुरवात केल्यावर आमच्या सारख्या अडाणी लोकांना कळेना हे येतंय तरी कुठुन ? सांगायचा मुद्दा हा आहे की आता व्हॉट्सएप यूजर्सचं चँटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी इमोजीच्या लिस्टमध्ये २३० नवीन इमोजींचा लवकरचं समावेश होणार आहे. युनिकोडने २०१९ साठी नवीन २३० इमोजींची अधिकृत लिस्ट प्रसिद्ध केली आहे.
आहे की नाही जबराट खुशखबर ? आता तुम्ही लगेच imagine करत असाल ना कोण कोणते इमोजी असतील याचा? फिकर नॉट बॉस..! पुढे वाचा तर खरं.
या इमोजींच्या लिस्टमध्ये ५९ नवीन इमोजींमध्ये १७१ व्हेरीअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी,फळ,भाज्या,पणती,बटर,रिक्शा, आईस क्यूब त्याच प्रमाणे व्हीलचेअर वर बसलेला माणूस,गाईड डॉग अशा नव्या इमोजींचा समावेश आहे. युनिकोडने काही नवीन रंगाची चिन्ह ही प्रसिद्ध केली आहेत. या सोबतच युजर्सच्या मागणीनुसार सफेद हृदयाच्या चिन्हाचाही समावेश आहे.
अहो सगळं खरं…खुशखबर मस्त वाटली पण हे ईमोजी येणार कधी ? खूप वाट बघावी लागणार, खरं हा हा म्हणता येईल ना सप्टेंबर. नवीन ईमोजी या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोम्बर पर्यंत येण्याची शक्यता आहे..आता वाट बघण्या शिवाय पर्याय नाही…