Home Uncategorized भाजपच्या नेत्यांची दाढी, कटींग करणार नाही : नाभिक संघटना

भाजपच्या नेत्यांची दाढी, कटींग करणार नाही : नाभिक संघटना

0

बहुमत मिळूनही भाजपला आज विरोधात बसावं लागणार असं दिसतंय. “मी पुन्हा येईल” असा गावोगावी जागर करून शेवटी  त्याच्या पदरात एक प्रकारे अपयश पडलं अशी चर्चा आहे आणि याला कारण केवळ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अहंकार आहे असं म्हटलं जातं आहे. दरम्यान नाभिक संघटनेने घेतलेला एक निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेल्या एका वक्तव्यावरून नाभिक बांधव चिडले आहेत त्यामुळे नाभिक संघटनेने या परिस्थिती विरोधात एक ठोस पाऊल उचललं आहे

यवतमाळमधील नाभिक संघटनेने भाजपच्या कुठल्याच आमदार, खासदार, मंत्र्यांची व नेत्याची दाढी किंवा कटींग करायची नाही, कुठल्याच प्रकारची मदत करायची असा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी नाभिक समाजाच्या भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. दौड तालुक्यातील एका कार्यक्रमात काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले होते, ” ज्याप्रमाणे न्हावी अर्धी अर्धी कटींग करतो, तसंच काँग्रेसने प्रत्येक ठेकेदाराला अर्धी अर्धी कामं देऊन अर्धवट कामं केली आहेत”  त्याच्या या वक्तव्याने नाभीम बांधव चिडले असून परिणामी नाभिक संघटनांनी यावर कुठल्याही भाजप नेत्याची दाढी कटिंग करायची नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे.