Home Uncategorized आयत्या बिळात चंदूबा”: राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल…

आयत्या बिळात चंदूबा”: राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल…

0

विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी पक्षांमधली रसीखेच वाढत चालली आहे. मिरवणूका, आश्वासनं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टोलेबाजी अगदीच जोरदार होत आहे. वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल्सवर तर नेतेमंडळींची लगबग आणि टोलेबाजी तर पाहायला मिळतेच. आता सोशल मीडिया देखील मागे राहिले नाही. इथे सर्रास एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून लढणारे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन टीकेचे शिकार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन एका जुन्या मराठी म्हणीचं विडंबन करून चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली आहे.
या ट्विटमध्ये ‘आयत्या बिळात चंदूबा…’ असं नमूद करण्यात आलं आहे. ‘आयत्या बिळावर नागोबा’ या म्हणीत फेरबदल करून ही म्हण बनवण्यात आली आहे व ‘कोथरूडमध्ये ‘चंपा’ जे करताहेत ते…’ असा या म्हणीचा अर्थही सोबत सांगण्यात आला आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. चंद्रकांत पाटील मूळ कोल्हापूरचे असून भाजपसाठी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. म्हणूनच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर हा निशाणा साधला आहे.