
दिल्ली मधील CAA कायद्याविरोधातील आंदोलन चांगलेच चिघळले आहे. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात ५ आंदोलक मृत्यूमुखी पडले असल्याचे वृत्त आहे. त्यातच पोलिसांचा माणुसकीला काळिमा फासणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर आंदोलनाच्या दोन्ही बाजूंचे असंख्य विडिओ सध्या व्हायरल होत असून काही व्हिडिओ मध्ये आंदोलक पोलिसांना दगड मारतांना तर काहींमध्ये पोलीस आंदोलकांना मारतांना दिसत आहेत. अशाच एका ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दिल्ली पोलीस ५ आंदोलकांना बेदम मारत असून त्यांना राष्ट्रगीत म्हणण्याची सक्ती करत आहेत. या ५ जणांपैकी एक जण रक्तबंबाळ झालेला आहे आणि हे सर्व खुद्द पोलीसच त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत असतांना दिसत आहेत. “वंदे मातरम बोला” असे धमकवतांना दिसत आहेत.
परवापासून या आंदोलनाचा वणवा पेटवला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या दिल्लीमध्ये असतांना असा जनप्रक्षोभ असणे ही चांगली बाब नसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे ठरत आहे. CAA विरुद्धच्या आंदोलनांचा भडका दिवसेंदिवस वाढत असून एका वेगळ्या वळणावर हे आंदोलन येऊन ठेपले आहे.
हा व्हिडिओ कुठे काढण्यात आला हे जरी अद्याप समजले नसले तरी त्यामुळे भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. समाजवादी पार्टीचे माजी खासदार शाहिद सिद्दीकी यांनी ‘व्हिडिओ मधील आंदोलक मुस्लिम मुले असून त्यांना पोलिसांनी मारहाण करत राष्ट्रगीत गाण्याची सक्ती केली’ असे ट्विट केले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ या आंदोलन चिघळण्यासाठी इंधन म्हणून काम करणार आहे हे नक्की!
बघा संपूर्ण व्हिडिओ